IMPIMP

राज्यात रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊतांचे भाष्य, म्हणाले- ‘…तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं’

by nagesh
shivsena sanjay raut central government coronavirus parliament session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

राज्यात रेमडेसिवीरवरुन सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली पाहिजे. जर त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि ते सरकारला डावलून रेमडेसिवीर मिळवू शकत असतील तर ते राज्यासाठी मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर त्यांनाही श्रेय घेता आले असते, असे राऊत म्हणाले. तसेच चौकशीसंदर्भात विचारणा केली असता जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

तर देशात अराजकता माजेल
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर बोलताना राऊत म्हणाले, एखाद्या मोठ्या युद्धात बॉम्बमुळे जसे सर्वकाही उद्ध्वस्त होते तसे सगळं उद्ध्वस्त होताना पहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम सुरु होते… ती लपवाछपवी आता बंद झाली आहे. त्याचाही विस्फोट झाल्याने अनेक राज्यात जागोजागी चिता भडकलेल्या दिसत आहेत. रस्त्यावर रुग्ण दिसू लागले आहेत. हे असेच होत राहिले तर कोरोनावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणार आहे. पुन्हा परिस्थिती लपवत राहिलो तर देशात अराजक माजेल असं चित्र स्पष्ट दिसत असल्याचे सांगत राऊत यांनी इशारा दिला आहे.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

अधिवेशन बोलावणे गरजेचं
संजय राऊत Sanjay Raut पुढे म्हणाले, प्रत्येक राज्यात काय चालले आहे ? देशाची परिस्थिती काय आहे ? सरकार काय करत आहे ? राज्यांना काय मदत आवश्यक आहे ? देशाची आर्थिक, आरोग्य स्थिती काय आहे ? यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंग पाळून एक विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशाची परिस्थिती गंभीर असल्याचे सर्वांनी मान्य केलं आहे. देशाच्या संकटावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

तर अमित शहांनी उपाययोजना जाहीर कराव्यात
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत उच्चपदस्थ बैठकीत व्यक्त करण्यात आले. यावर अमित शहा यांनी घाईत लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाऊन करण्याची गरज नाही असे वाटत असेल तर जी माणसं मरत आहेत, ऑक्सिजन तसंच बेडशिवाय तडफडत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात, असे राऊत म्हणाले.

Also Read :

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

Related Posts