IMPIMP

Video : ‘Lockdown करणं हे राज्याला आता पेलवणारं नाही, हे सरकार फसवाफसवीचे धंदे करतंय’

by bali123
Narayan Rane - Uddhav Thackeray | Serious charge of Narayan Rane; Said - 'Uddhav Thackeray had given betel nut to Chota Rajan and Chota Shakeel to kill me'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – लॉकडाऊन करणं हे राज्याला पेलवणारं नाही. हे सरकार फसवाफसवीचे धंदे करतंय असं म्हणत भाजपचे खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘हे राज्य काय तुम्ही विकत घेतलं आहे का ? मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी बोलताना मान सन्मान देऊन बोलायला हवं’
नारायण राणे Narayan Rane म्हणाले, अन्य राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मग महाराष्ट्रात का वाढते आहे ? या मुख्यमंत्र्यांनी, या सरकारनं नक्की काय केलं ? आता सगळीकडून उठाव होऊ लागल्यानं घाबरले आहेत. त्यांना लॉकडाऊनची धमकी देण्याचा अधिकार आहे का ? शिस्त पाळा नाहीतर आम्ही लॉकडाऊन सुरू करू असं ते नागरिकांना सांगत आहेत. हे राज्य काय तुम्ही विकत घेतलं आहे का ? मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी बोलताना मान सन्मान देऊन बोलायला हवं असंही राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

‘लॉकडाऊन करणं हे राज्याला आता पेलवणारं नाही, हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे’
पुढं बोलताना नारायण राणे Narayan Rane म्हणाले, कोरोना संसर्ग वाढला म्हणून लॉकडाऊन करणं हे राज्याला आता पेलवणारं नाही. आज बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावी गेलं तरी हीच परिस्थिती आहे. सर्व उद्योगधंदे कोलमडले आहेत. याची चिंता राज्य सरकारला आहे की नाही ? हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे अशी खोचक टीका राणे यांनी यावेळी बोलताना केली.

‘आता काय घरी बसायचं का ? लोकांनी खायचं काय ? रहायचं कसं ? मुलांना शिकवायचं कसं ?’
नारायण राणे Narayan Rane म्हणाले, आता सरकार नरमलं आहे. निर्बंधाच्या गोष्टी करत आहे. तसंच आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन म्हणत आहे. माणसं दिवसभर काम करून संध्याकाळी घरी जातात, मग खरेदीला जातील, अन्य कुठे जातील, आता काय घरी बसायचं का ? लोकांनी खायचं काय ? रहायचं कसं ? मुलांना शिकवायचं कसं ? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री काहीही बोलत नाहीत असा मुद्दा देखील राणे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

‘दोन वेळचं जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री घरी पाठवणार आहेत का ?’
नारायण राणे Narayan Rane असंही म्हणाले की, लॉकडाऊनंतर उदरनिर्वाहाचं साधन संपल्यानंतर जनेतनं काय करावं ? दोन वेळचं जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री घरी पाठवणार आहेत का ? कोरोनामुळं या राज्य सरकारचं नाक कापलं ते सोडून द्या, पण महाराष्ट्र आर्थिक बाबतीत मागे गेला आहे. अधोगतीकडे गेला आहे. याला कारण हे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार आहे असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts