IMPIMP

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

by bali123
Maharashtra Unlock | maharashtra government will consider opening restrictions covid 19 cm seeks suggestions from health ministry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना (COVID-19) चा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. परंतु महाविकासमधील राष्ट्रवादी पक्षासह विरोधकांचाही याला विरोध आहे. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली असून तशा चर्चाही रगंल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सायंकाळी 5 वाजता यासंदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात लॉकडाऊन लागणार की, कडक निर्बंध लागणार हे यावेळीच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

राज्यात कोरोनाचा विस्फोट होत आहे. दैनंदिन रुग्णवाढीत गुरुवारी नवा उच्चांक पहायला मिळाला. गुरुवारी (दि 1 एप्रिल) 24 तासात राज्यात 43,183 नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली. तर 249 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक 8,646 नवे रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 66 हजार 533 एवढी आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजेच 64,599 रुग्ण पुण्यात आहे तर 54,807 एवढे रुग्ण हे मुंबईतील आहेत.

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

राज्यातील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडी समोर आहे. राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहिल. परंतु रेस्टॉरंट, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. 50 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी कोरोना कृती दलाच्या सदस्यांसोबत घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोनाची दुसीर लाट रोखण्यासाठी कठोर उपायांवर भर दिला होता. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

Also Read:

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts