IMPIMP

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

by bali123
cm uddhav thackeray chair high level meeting officials over corona situation state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी तब्बल 43 हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळून आले होते. देशात एकूण 81 हजारांच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील 43 हजार रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी आज (शुक्रवार) महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुख्यमंत्र्यांनी uddhav thackeray राज्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे.

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

काल राज्यात 43 हजार 183 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. तर सध्या देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 3 लाख 66 हजार 533 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. याबैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपासून रात्रीची जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. मास्कचा वापर होत नसल्याने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

कसा असेल लॉकडाऊन.. 5 निर्बंध सरकारच्या विचाराधीन ?
1.
राज्यात सुरु असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून ती संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत करण्याचा विचार. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत दुकाने, हॉटेल, बाजारपेठ सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
2. सर्वात जास्त फूट फॉल म्हणजे गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळं, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंटवर बंदी घातली जाऊ शकते. संक्रमणाचे केंद्र अलेल्या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत.
3. एकाच परिसरात, विभागातील दुकानं एक दिवसाआड सुरु ठेवण्याचा विचार, एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकानं एका दिवशी सुरु राहतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील दुकानं सुरु राहतील.
4. सर्व खासगी ऑफिसेसना पुढच्या काही कालावधीसाठी वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याचा विचार. याशिवाय शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये रोटा पद्धतीने किंवा कमीत कमी क्षमतेने सुरु ठेवण्याच्या पर्यायाची चाचपणी
5. मुंबईतील लोकल ट्रेन पूर्णपणे बंद करण्याबाबत अद्याप कोणताही विचार नाही. मात्र, लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच परवानगी देण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे सूत्रांची माहिती.

Also Read:

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts