IMPIMP

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

by bali123
there was no pressure on fadnavis to reinstate sachin vaze says minister nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दबाव आणला होता, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fandanvis यांनी केला होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे वाझेंना सेवेत घेण्यासाठी ठाकरे यांनी कोणताही दबाव फडणवीस devendra fandanvis यांच्यावर टाकला नव्हता. आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. वाझे हे थेट आयुक्तांना रिपोर्ट करायचे. त्यामुळेच कुठेतरी तेही जबाबदार ठरतात व त्यातूनच त्यांची आता बदली केल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

परमबीर सिंग यांची बदली हा प्रशासकीय आवश्यकतेनुसार घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे आणि तो त्यांचा अधिकार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. वाझे यांच्या अटकेनंतर ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत त्याने मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही मलिक यांनी मान्य केले आहे तसेच मलिक यांनी जळगावात महापालिकेत झालेल्या उलथापालथीवर भाष्य केले. महापालिकेत ज्याप्रकारे सत्तांतर झाले आहे त्यातून भाजपला बोध घेण्याची गरज आहे. सांगलीत जे घडल तेच आता जळगावात घडल आहे. भाजपपूर्वी जे करत होतं तेच आता त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी होत असल्याचा टोला मलिक यांनी लगावला आहे.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts