IMPIMP

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

by bali123
sachin vaze arrest case another policemanto be arrested by nia mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सचिन वाझे sachin vaze यांना अटक झाल्यानंतर आता आणखी काही पोलीस अधिकारी एनआयएच्या रडावर आहेत. त्यापैकी एका अधिकाऱ्याला एनआयए अटक करण्याची शक्यता आहे. हा पोलिस अधिकारी तोच आहे ज्याने सचिन वाझेला sachin vaze  या गुन्ह्यात मदत केली. तसेच या गुंतागुंतीचा कट रचला होता. एवढेच नाही तर या पोलिस अधिकाऱ्यावर पुरावे नष्ट करण्याची जबाबदारी होती.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

 

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मायकल रोडवर हिरव्या रंगाच्या पार्क केलेल्या गाडी प्रकरणातील अनेक पुरावे या पोलिस अधिकाऱ्याने मिटवले. याशिवाय तपासामध्ये त्याने महत्वाच्या साक्षी, साक्षीदार नोंदवले नाहीत. तर त्याने साक्षीदारांना धमकावून घटनेच्या विरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले, असा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. या अधिकाऱ्यावर एनआयएचा सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे एनआयएचे अधिकारी त्याच्या मागावर होते. सध्या ती व्यक्ती एनआयएच्या ताब्यात असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा संशय
गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यासाठी त्या आणण्यात या पोलिसाचा समावेश होता असा संशय आहे. तसेच गाडीत सापडलेले धमकीचे पत्र लिहिण्यामागे याच पोलिसाचे डोके होते, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात सचिन वाझे sachin vaze याला अटक केल्यानंतर या पोलिस अधिकाऱ्याची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गाड्यांचे बनावट नंबर प्लेट बनवणे, ज्यांनी या नंबर प्लेट तयार केल्या आहेत, त्यांचे सर्व रेकॉर्ड ताब्यात घेऊन ते नष्ट करणे हे देखील काम या अधिकाऱ्याने केल्याचा संशय एनआयएला आहे.

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

हिरेन गायब होण्यामागे हाच पोलिस
स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर गाडी मालक मनसुख हिरेन यांना गायब करण्यात याच पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. हिरेन यांचा मोबाईल वसईच्या मांडवी ते तुंगारेश्वर या दरम्यान बंद झाला होता. यात देखील याच अधिकाऱ्याचा संबंध असल्याचा अंदाज एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे कसून चौकशी सुरु असून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट उघडकीस येण्याची शक्यता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठया निर्णयाची शक्यता

Related Posts