IMPIMP

Virar Hospital Fire : विरार येथील आगीच्या दुर्घटनेनंतर फडणवीसांची ठाकरे सरकारला विनंती; म्हणाले…

by Team Deccan Express
Devendra Fadnavis | no chief minister understands the chief minister fadnavis criticizes cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात भीषण आग लागली होती. या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुन्हा अशा घटना होणार नाहीत, यासाठी काही प्रभावी पावले सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे’, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयांत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. आज झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘प्रत्येक घटनेनंतर आम्ही याची चौकशी करू असे मुख्यमंत्री आणि प्रशासन सांगत असतात. तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट करू, असेही सांगण्यात येते. मात्र, असे ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. भंडारा, ईशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत’.

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

तसेच कोविड काळात रुग्णालयांवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स रुग्णालयांमध्ये कसे करता येतील हे पाहिले पाहिजे. गरज असेल तर सरकारने रुग्णालयाला मदत केली पाहिजे. तेथील रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करावा, असेही फडणवीस devendra fadnavis म्हणाले.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती
नाशिकच्या महापालिका रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे ऑक्सिजनअभावी तेथील 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता विरार येथील रुग्णालयात ही घटना घडली आहे. यामध्येही 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी या घटनांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करावा , अशी मागणी केली आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts