IMPIMP

ICC कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत आर अश्विनची पाचव्या स्थानावर झेप

by sikandershaikh
ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत आघाडीच्या पाच खेळाडूंमध्ये पोहचला आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने शतकी खेळी करुन 8 विकेट घेतल्या होत्या. त्याने आजपर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली होती. फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम राहिला आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारीत अश्विन (ravichandran ashwin) 804 गुणांसह सातव्या स्थानी आहे. तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने 761 गुणांसाह आपले आठवे स्थान कायम राखले आहे. 908 गुण मिळवून ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने अव्वल स्थान पटकावले आहे.

आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत वेस्ट इंडीजच्या जेसन हॉल्डरने प्रथम स्थान पटकावले आहे. भारताच्या रविंद्र जडेजाने 403 गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने 397 गुणांसह तिसरे, बांगला देशच्या शाकिब अल हसनने 352 गुणांसह चौथे तर अश्विनने 337 गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे.

चेन्नईच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला आणि दुसऱ्या डावात 62 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीच्या खात्यात 838 गुण असून तो फलंदाजीच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन 919 गुणांसह आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ स्टीव्ह स्मिथ (891), मार्नस लाबुशेन (878) आणि जो रुट (869) गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
https://twitter.com/ICC/status/1361950474761510913

Punjab Kings Xi IPL 2021 Auction : पंजाबच्या संघाने नावात का बदल केला ? कर्णधार केएल राहुलने केला खुलासा

Related Posts