IMPIMP

Aadhaar card बनवणं झालं अगदी सोप, परंतु बदल केला तर बदलतील नाही ’नाते’; आता पती, वडिलांचा उल्लेख नाही, त्याठिकाणी ’केयर ऑफ’

by nagesh
Aadhaar Card | aadhaar card become more easy to make but changes in it then relationship will be changed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Aadhaar card मध्ये जर कोणत्याही प्रकारचा बदल करणार असाल तर आपले वडिल किंवा पतीसोबत कार्डमध्ये नात्याची ओळख (dentity of the relationship) समोर येणार नाही. आधार कार्ड आता नाते जाहिर करणारे कागदपत्र राहिलेले नाही (Aadhaar card is not a relationship declaration document). हे केवळ विशिष्ट ओळखीचे माध्यम राहिले आहे.

 

दिल्ली पोलीस दलातील निवृत्त सब इन्स्पेटक्टर रंधीर सिंह त्यावेळी हैराण झाले जेव्हा पत्नीच्या आधार कार्डमध्ये घराचा पत्ता बदलला असता ’वाईफ ऑफ’च्या ऐवजी ’केयर ऑफ’ (Care Off) मध्ये त्यांचे नाव आले.

 

 

बदल केला तर दिसणार नाही नातेसंबंध

पहिल्यांदा त्यांना वाटले की कम्प्युटर सिस्टम मध्ये काही तरी बिघाड असेल. नंतर ते आधार कार्डातील बदलासाठी पोस्ट ऑफिस, बँक आणि इतर अनेक अधिकृत केंद्रांवर गेले, परंतु सर्व केंद्रांवर केयर ऑफमध्येच त्यांचे नाव येत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सिंह अगोदर अशोक विहार पोलीस कॉलनीत राहात होते आणि निवृत्तीनंतर प्रीतमपुरामध्ये राहू लागले.
यासाठी ते कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी गेले होते. मुलाच्याही आधार
कार्डमध्ये पत्ता बदलल्यानंतर वडिलांच्या नात्याच्या ठिकाणी केयर ऑफ येत होते.

 

 

सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर आधारित बदल

याबाबत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की,
2018 मध्ये आधारबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता. त्या निर्णयात लोकांच्या वैयक्तिकतेबाबत म्हटले
होते.

 

त्या आधारावरच आता आधार कार्डमध्ये नात्याची माहिती दिली जात नाही. मात्र, हा बदल कोणत्या वर्षाच्या
कोणत्या महिन्यापासून करण्यात आलेला आहे हे यूआयडीएआयने सांगितले नाही. आता आधार कार्ड बनवणे
देखील सोपे झाले आहे.

 

Web Title : Aadhaar Card | aadhaar card become more easy to make but changes in it then relationship will be changed

 

हे देखील वाचा :

High BP | उच्च रक्तदाबाची सर्वसामान्य दिसणारी ‘ही’ लक्षणे तुम्हाला माहीत आहेत?, जाणुन घ्या

T20 World Cup 2021 | ‘टी’ 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित, जाणुन घ्या 15 सदस्यांची नावे

EPFO | पीएफ खातेधारक होणार ‘मालामाल’, अकाऊंटमध्ये लवकरच येईल मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts