IMPIMP

BH Series | वाहने हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्याच्या अडचणी संपुष्टात, बीएच सीरिज लॉन्च, जाणून घ्या काय आहे हे आणि कसा मिळेल तुम्हाला फायदा

by nagesh
BH Series | ministry of road transport and highways introduced new registration mark for new vehicles bh series

नवी दिल्ली : वृत्तसंस्था BH Series | रस्ते परिवहन मंत्रालयाच्या (ministry of road transport and highways) एका नवीन नोटिफिकेशननंतर गाड्यांच्या ट्रान्सफरमध्ये सुविधा होणार आहे. सुरक्षा कर्मचारी, केंद्र आणि राज्य कर्मचारी, पीएसयू आणि प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या आणि संस्था ज्यांची ऑफिस 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांत आहेत, त्यांचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक गाड्यांचे रजिस्ट्रेशन BH Series (भारत) सीरीजमध्ये करू शकतात.

सरकारकडून अधिसूचित ही योजना सध्या एैच्छिक आहे, म्हणजे ती अनिवार्य केलेली नाही. सध्या कुणीही वाहन मालक आपली गाडी रजिस्टर्ड राज्याशिवाय इतर रात्यात कमाल 1 वर्षासाठी ठेवू शकतो. 12 महिने संपल्यानंतर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करावे लागते. BH सीरीज यासाठी सुरू केली आहे, ज्यामुळे खासगी वाहनांचे ट्रान्सफर अतिशय सोपे आणि अडचणीशिवाय केले जाऊ शकते.

BH सीरीज (भारत सीरीज) च्या वाहनांसाठी दुसर्‍या राज्यात गेल्यानंतर दुसर्‍यांदा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसेल. त्यांना दोन वर्षांचा रोड टॅक्स किंवा त्यापेक्षा जास्त पैसे भरावे लागतील. यासाठी आरटीओकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय आहेत याचे फायदे

शेवटच्या नोटिफिकेशनमध्ये IN ऐवजी BH करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यात रोड टॅक्सचा स्लॅब वेगवेगळा असतो, परंतु आता बीएच सीरीजमध्ये 10 लाखापर्यंत किंमतीच्या वाहनासाठी 8 टक्के, 10 ते 20 लाखाच्या गाडीसाठी 10 टक्के, 20 लाखापेक्षा जास्तीच्या गाडीसाठी 12 टक्के टॅक्स ठरवला आहे.

डिझेल वाहनांसाठी 2% अतिरिक्त शुल्क आणि इलेक्ट्रिक वाहनांवर 2% कमी टॅक्स लावला जाईल. 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोटर वाहनावर वार्षिक कर लावला जाईल, जो अगोदर वसूल केलेल्या रक्कमेच्या निम्मा असेल.

 

Web Title : BH Series | ministry of road transport and highways introduced new registration mark for new vehicles bh series

 

हे देखील वाचा :

High Court Observation | घटस्फोट होण्यापूर्वी दुसऱ्या विवाहास उताविळ झालेली पत्नी क्रूरच

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवस मुसळधार पाऊस; जाणून घ्या पुण्यात काय असणार परिस्थिती

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts