IMPIMP

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

by nagesh
Pune Court | harassment of a minor student! Three years hard labor for a teacher in Chinchwad; A fine of Rs 50,000

अहमदाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन –  High Court | एका महिलेवर तिच्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्यासाठी दबाव टाकता येऊ शकतो का, गुजरात हायकोर्टने हा प्रश्न उपस्थित करत याविरूद्ध आपले मत जाहीर केले आहे. हायकोर्टने म्हटले की, कोणत्याही महिलेसाठी 18 वर्षाच्या वयापूर्वी मुल जन्माला घालणे कोणत्याही प्रकारे अवैध नाही. हायकोर्टने (High Court) ही टिप्पणी गुजरातच्या एका दुष्कृत्याच्या प्रकरणावरील सुनावणी करताना केली.

प्रकरणाच्या सुनावणीत जस्टिस परेश उपाध्याय यांच्या खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला की, महिलेसाठी गर्भातील बाळाच्या पित्याचे नाव सांगण्याची सक्ती कुठे नोंदलेली आहे का.
जर कुणी अविवाहित महिला दुष्कृत्याची तक्रार नोंदवत नसेल आणि तिला बाळाला जन्म द्यायचा असेल, तर तिला पित्याचे नाव सांगण्यासाठी सक्त कशी करता येईल.

खंडपीठाने ही बाब अल्पवयीन पीडितेला दुष्कृत्याच्या प्रकरणात खालच्या न्यायालयाकडून दहा वर्षाच्या कठोर कारावासाच्या शिक्षेविरूद्ध दाखल याचिकेची सुनावणी करताना सांगितली आहे.
हे प्रकरण मुलीसोबत बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे (पोक्सो) आहे.

पीडित मुलगी जूनागढ जिल्ह्यातील राहणारी आहे.
तिने विवाह न करता दोषी सोबत राहून दोन मुलांना जन्म दिला. दोन्ही मुलांना पित्याने सुद्धा त्यांना आपले म्हटले आहे.
मुलीने म्हटले, तिने आपल्या इच्छेने वडिलांचे घर सोडले आणि दोषी ठरवलेल्या तरूणासोबत राहायला गेली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याच दरम्यान तिने दोन मुलांना जन्म दिला. पहिल्या मुलाला तेव्हा जन्म दिला,
जेव्हा ती अल्पवयीन होती. हायकोर्टच्या खंडपीठाने विचारले की, ती गरीब ग्रामीण मुलगी आहे.
जर कुणी अविवाहित महिला विवाहाशिवाय गरोदर राहिली आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली तर डॉक्टर तिला त्या गर्भातील मुलाच्या पित्याचे नाव विचारू शकतात का?

खंडपीठाने म्हटले, तिला माहिती नसते की, आपल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगणे आवश्यक आहे का. एखाद्या महिलेवर अशी सक्ती करणे कुठे नोंदलेले आहे? मुलीचे पहिले मुल 29 जून, 2019 ला जन्मले,
तर दुसरे मुल 22 जानेवारी 2021 ला जन्मले. मुलगी 24 मार्च 2020 ला 18 वर्षाची झाली.
पुढल्या दिवशी 25 मार्चला तिचा विवाह दोषी ठरवलेल्या तरुणासोबत होणार होता,
परंतु कोरोनापासून बचाव करण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे तो होऊ शकला नाही.

तर दुसरे मुल झाल्यानंतर पहिल्या मुलाचा संदर्भ देत मुलीच्या पित्याने दृष्कृत्याचा रिपोर्ट दाखल केला.
याच रिपोर्टच्या आधारावर तरूणाला खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली.

 

Web Title : High Court | ahmedabad gujarat high court says it is not necessary to tell name of father of child born without marriage

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | शिवसेना आमदारचं वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढतो’ (व्हिडीओ)

Pune Crime | भादलवाडीमध्ये गळा चिरुन तरुणाचा खुन

Chhagan Bhujbal | भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता जप्त’

 

Related Posts