IMPIMP

IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

by nagesh
IAF MiG-21 Crash | indian-air-force-mig-21-fighter-aircraft-crashed-near-hanumangarh-in-rajasthan-2-died-2 injured

सरकारसत्ता ऑनलाईन   IAF MiG-21 Crash | भारतीय लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये (Rajasthan) भीषण अपघात झाला आहे. भारतीय
हवाई दलाचे मिग-२१ या लढाऊ विमानाने सुरतगड (Suratgarh) येथून विमानाने उड्डाण केले होते. मात्र हे विमान सोमवारी (८ मे) सकाळी
राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले (IAF MiG-21 Crash). अपघातादरम्यान वैमानिकाने (Pilot ) प्रसंगावधान दाखवत पॅराशूटच्या मदतीने
विमानातून उडी घेत आपला जीव वाचवला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मात्र, भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान एका घरावर कोसळले. परिणामी या घरातील एका महिलेचा व एका पुरुषाचा र्दुदैवी मृत्यू झाला आहे. अद्याप हवाई दलाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (IAF MiG-21 Crash)

 

 

या घटनेबाबत स्थानिक पोलीसांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, या दुर्घटनेनंतर पायलटला एअरलिफ्ट (Airlift ) करण्यात आले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे Mi 17 पाठवण्यात आले आहे. मिग-२१ ज्या छतावर पडले तिथे तीन महिला आणि एक पुरुष असे लोक उपस्थित होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 2

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  IAF MiG-21 Crash | indian-air-force-mig-21-fighter-aircraft-crashed-near-hanumangarh-in-rajasthan-2-died-2 injured

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – निवृत्त विंग कमांडरची वाहन चालकाकडून 40 लाखांची फसवणूक

 

Related Posts