IMPIMP

Manoranjan Joshi | रेकॉर्डिंग अगोदर पत्रकाराला मिळाली आईच्या निधनाची बातमी, बंद केला नाही इंटरव्ह्यू; सर्वत्र कौतूक

by nagesh
Manoranjan Joshi | just before recording journalist got news of demises of his mother but did not stop interview everyone is praising

भुवनेश्वर : वृत्तसंस्था Manoranjan Joshi | 24 ऑगस्टच्या दुपारी लोकप्रिय उडिया चॅनल ओटीव्ही (Oriya channel OTV) वर एका टॉक शोची शूटिंग करत असलेले मनोरंजन जोशी (Manoranjan Joshi) आपला मोबाइल फोन (mobile phone) फ्लाइट मोडमध्ये टाकणारच होते, इतक्यात त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली. जोशी यांच्या मित्राने फोनवर त्यांना सांगितले की, त्यांच्या 73 वर्षांच्या आईचे भुवनेश्वरच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना वाटतेच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये निधन (mother died in an ambulance) झाले.

कोणत्याही माणसासाठी आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी अतिशय वेदनादायी असते. बोलनगीरचे टीव्ही पत्रकार 44 वर्षीय जोशी यांनाही असेच काहीसे
झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारा प्रसाद बहिनीपती यांची मुलाखत घेण्यापूर्वी ही बातमी आल्याने ते अस्वस्थ होते.

मात्र, त्यांना नॉर्मल होण्यास काही सेकंद लागले. काँग्रेस नेते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सल्ला दिला की, शो रद्द केला जाऊ शकतो, पण जोशी यांनी
मुलाखत पूर्ण केली. काँग्रेस नेत्याला ‘खोला कथा‘ नावाच्या टॉक शोसाठी प्रश्नही विचारले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

ओटीव्हीचे संपादक राधा माधव मिश्रा (OTV editor Radha Madhav Mishra) यांनी म्हटले की, त्यांनी या गोष्टीचा आदर्श समोर ठेवला आहे की,
प्रोफेशनलिज्म काय आहे. ते शो रद्द करू शकले असते, परंतु त्यांनी आजूबाजूच्या सर्व लोकांना शो सुरूठेवण्यास सांगितले.

त्यांचे म्हणणे होते की, दुःख प्रतिक्षा करू शकते. सामान्यपणे लोक या गोष्टीचे कौतूक कधीही करत नाहीत की, पत्रकार वेळेचे बंधन न पाळता आणि
कठिण परिस्थितीत कसे काम करतात. परंतु मनोरंजन यांनी जे केले त्यामुळे त्यांचे सर्वजण कौतूक करत आहेत.

सोशल मीडियावर सुद्धा जे लोक जोशी यांना ओळखतात ते प्रतिबद्धतेच्या भावनेसाठी कौतूक करत आहे आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रीला श्रद्धांजली
अर्पण करत आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Manoranjan Joshi | just before recording journalist got news of demises of his mother but did not stop interview everyone is praising

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील कोव्हीड केंद्रात पुन्हा चोरी, डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर गायब

Modi Government | शेतकर्‍यांना मोदी सरकार दर महिना देते 3000 रुपये, केवळ करावे लागेल ‘हे’ छोटे काम? जाणून घ्या

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

 

Related Posts