IMPIMP

New Labour Code | 1 ऑक्टोबरपासून बदलणार कामगार कायदा, इनहँड सॅलरीवर होणार परिणाम, 12 तास काम!

by nagesh
Modi Government | from october 1 office time will be for 12 hours pf will increase check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Labour Code | केंद्र सरकार एक ऑक्टोबरपासून कामगार कायद्याच्या नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर कामगार कायद्याचा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. नवीन कामगार कायद्यात (New Labour Code) ऑफिस टाइम वाढवला जाईल. 12 तास काम करण्याचा प्रस्ताव या कायद्यात आहे. शिवाय इनहँड सॅलरीवर या कायद्याचा परिणाम होणार आहे.

या कायद्यांतर्गत कर्मचार्‍यांना आठवड्यात चार दिवसच काम करावे लागेल तर तीन दिवस सुट्टी असेल.
मात्र, यासाठी कर्मचार्‍यांना 8 तासाऐवजी 12 तास काम करावे लागेल.

इतकेच नव्हे, नवीन नियमात 30 मिनिटांचा हिशेब करून 15 ते 30 मिनिटांच्या मधील अतिरिक्त कामाला ओव्हरटाइममध्ये सहभागी करण्याची तरतूद आहे.
सध्याच्या वेळात 30 मिनिटापेक्षा कमी वेळेला ओव्हरटाइम योग्य मानले जात नाही.
तर कर्मचार्‍यांना प्रत्येक पाच तासानंतर अर्ध्यातासानंतर देण्याची सुद्धा तरतूद आहे.

संसदेने ऑगस्ट 2019 मध्ये तीन लेबर कोड, औद्योगिक, कामाची सुरक्षा, आरोग्य आणि काम करण्याची स्थिती आणि सामाजिक सुरक्षासंबंधी नियमात दुरूस्ती केली होती.
हे नियम सप्टेंबर 2020 ला संमत करण्यात आले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय आहे नवीन वेज कोड?

सरकारने 29 कामगार कायद्यांचे मिळून 4 नवीन वेज कोड तयार केले आहेत-

1- इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड

2- कोड ऑन ऑक्यूपेशन सेफ्टी

3- हेल्थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड (OSH)

4- सोशल सिक्युरिटी कोड आणि कोड ऑन वेजेस

वेज कोड अ‍ॅक्ट (Wage Code Act), 2019नुसार, एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी कंपनीच्या खर्चाच्या (Cost To Company-CTC) 50 टक्केपेक्षा कमी असू शकत नाही.
सध्या अनेक कंपन्या बेसिक सॅलरी खुप कमी करून वरील भत्ते जास्त देतात, जेणेकरून कंपनीवर भार कमी पडावा.

पीएफ आणि ग्रॅच्युटी सारख्या इतर घटकांसाठी कर्मचार्‍यांचे योगदान वाढेल.
न्यू वेज कोड लागू झाल्यावर बोनस, पेन्शन, वाहन भत्ता, घरभाडे भत्ता, निवास लाभ, ओव्हरटाइम इत्यादी बाहेर होईल.
कंपन्यांना हे ठरवावे लागेल की, बेसिक सॅलरी सोडून सीटीसीमध्ये समावेश केलेले काही इतर घटक 50 टक्केपेक्षा जास्त होऊ नयेत आणि उर्वरित अर्ध्यात बेसिक सॅलरी असावी.

 

निवृत्तीनंतर मिळतील जास्त पैसे

ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये योगदान वाढल्याने निवृत्तीनंतर मिळणार्‍या रक्कमेत वाढ होईल.
जास्त पगार असलेल्या अधिकार्‍यांच्या वेतन रचनेत जास्त बदल होईल आणि यामुळे ते सर्वात जास्त प्रभावित होतील. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्याने कंपनीच्या खर्चात वाढ होईल.
कंपन्यांची बॅलन्सशीट प्रभावित होईल.

 

Web Title : New Labour Code | new wage code update new wage code be effective 1st october 2021 if you will work 30 minutes more you will get overtime

 

हे देखील वाचा :

Anti-Corruption | इचलकरंजीत 3 लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 250 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

 

Related Posts