IMPIMP

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Cantonment | Big action of Pune Cantonment Board! Delhi Darbar, Sujata Mastani, Shegaon Kachori 'seals' closed in Pulgate area, find out the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cantonment | व्यापार परवाना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल दिल्ली दरबार (Delhi Darbar), सुजाता मस्तानी (Sujata Mastani) आणि शेगाव कचोरी (Shegaon Kachori) हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Pune Cantonment Board) सील (Seal) केले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने ही कारवाई शुक्रवारी (दि.17) केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार (Pune Cantonment CEO Amit Kumar) यांनी सांगितले की, आरोग्य विभागाने कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार अनिवार्य व्यापार परवाना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या अस्थापना सील केल्या असून पुढील आदेश येईपर्यंत या अस्थापना बंद राहणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे कॅन्टोन्मेंट भागामध्ये तब्बल 700 दुकाने विनापरवाना सुरु असून, चालकांनी परवाना (business license) घ्यावा, यासाठी व्यापाऱ्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, याला व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांना परवाना घेण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने (Encroachment Department) कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध हॉटेलसह दोन दुकाने सील करण्यात आली आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आर.टी. शेख (R.T. Sheikh) यांनी सांगितले की, पुलगेट (Pulgate) परिसरातील प्रसिद्ध शेगाव कचोरी, सुजाता मस्तानी आणि अरोरो टॉवरच्या (aurora towers pune) मागे असलेले दिल्ली दरबार हॉटेल सील करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
यापुढेही पोलिसांच्या सुरक्षेत दहा दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :

Gravittus Foundation | ‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम; देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू

Maharashtra Political News | देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, नव्या समीकरणांचे संकेत?

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

Related Posts