IMPIMP

Pune Crime | मार्केटयार्ड येथील व्यापार्‍याला धमकी ! 40 लाख कात्रज घाटात आणून दे; नाहीतर बायको, मुलांना किडनॅप करुन ठार मारील

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मार्केटयार्ड येथील एका व्यापार्‍याला (Businessman In Marketyard Pune) ४० लाख रुपये आणून दे, नाही तर बायको, मुलीस व कुटुंबातील व्यक्तींचे अपहरण करुन ठार (Kidnapping And Murder Threat) मारील अशी धमकी देण्यात आली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या व्यापार्‍याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केटयार्डमध्ये व्यापार आहे.
१ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक कॉल (Mobile Call) आला.
त्यात मोबाईल करणार्‍याने फोन करुन ४० लाख रुपये कात्रज घाटात (Katraj Ghat) पुलाखाली आणून दे, नाही तर तुझ्या बायको, मुलीस व कुटुंबातील व्यक्तींना किडनॅप करुन ठार मारील, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी तातडीने घाबरुन मार्केटयार्ड पोलिसांकडे धाव घेतली. त्याने सांगितल्याप्रमाणे रात्री बारा वाजता हे व्यापारी दिलेल्या ठिकाणी गेले. परंतु, पैसे घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यानंतर त्यांनी वाट पाहिली. पण कोणीही संपर्क केला नाही. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Businessman at Market Yard threatened Bring 40 lakhs to Katraj Ghat Otherwise the wife children will kidnap and kill

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कचरा वेचणाऱ्या तिघांवर उकळतं पाणी ओतलं; दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Modi Government | मोदी सरकार देणार कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ ?

Ajit Pawar | अजित पवारांनी पोलिस आयुक्तांसमोरच भरकार्यक्रमात दिला पोलिस उपायुक्तांना सल्ला; म्हणाले – ‘जरा बारीक व्हा’ (व्हिडीओ)

Related Posts