IMPIMP

WhatsApp वापरकर्त्यांना झटका ! फेसबुक पाहतंय तुमचे खासगी मेसेज? रिपोर्टमधून दावा

by nagesh
WhatsApp Facebook Meta | whatsapp design changed as facebook rebranding meta starts showing on android ios mark zuckerberg

नवी दिल्ली : वृत्तसंस्था व्हॉट्सअ‍ॅप हे एकमेंकास संवाद साधण्याचं अत्यंत अत्युच्च माध्यम झालं आहे. देशातील अनेक लोकांकडे WhatsApp चा वापर होताना दिसतो आहे. दरम्यान मागील काही दिवसापुर्वी WhatsApp च्या नवीन धोरणामुळे चांगलंच चर्चेत आलं होतं. वापरकर्ते यांच्यासाठी वापरात असलेलं Chatting आणखी मजेशीर आणि सोपं व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवनवीन फिचर पुढं आणत असते. तर. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांंना एक मोठा दणका बसला आहे. व्हॉट्सअ‍ॅप मधील तुमचे खासगी मेसेज (Private message) सुरक्षित आहेत का? हा पुन्हा प्रश्न ऎरणीवर आला आहे.

 

खासगी मेसेज (Private message) पूर्णपणे सुरक्षित असतात व कंपनी देखील वाचत नाही. मात्र, एका नवीन रिपोर्टमध्ये याउलट दावा करण्यात आला आहे. Propublica कडून आलेल्या एका रिपोर्टनुसार, Facebook व्हॉट्सअ‍ॅपवरील खासगी मेसेज वाचू शकतं व शेअर देखील करू शकतं. व्हॉट्सअ‍ॅपने हजारपेक्षा अधिक लोकांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवले आहे, जे ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरच्या ऑफिसमध्ये असतात. तेथून कर्मचारी लाखो यूजर्सचे कंन्टेंट तपासतात. असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तर, विशेष म्हणजे, कर्मचारी Facebook च्या सॉफ्टवेअरचा वापर करून वापरकर्त्यांचे खासगी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ बघु शकतात. यासाठी कंपनी त्यांना पगार देते असं सांगितलं आहे.
Whatsapp वर साइन अप केल्यानंतर कंपनी त्यांना मेसेज पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करते.
कंपनीचा दावा आहे की, मेसेज पूर्णपणे सुरक्षित असून, कंपनी देखील पाहू शकत नाही.
परंतु, रिपोर्टमध्ये कंपनीचा हा दावा फेटाळण्यात आलाय.

 

ऑस्टिन व अन्य ठिकाणी टीम चुकीचे व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवणे व त्यांना हटवण्यासाठी Whatsapp मेसेजला रिव्ह्यू करते.
मात्र, फक्त अशा कंन्टेंटला रिव्ह्यू केले जाते, जे धोकादायक आहे.
यात फसवणूक, चाइल्ड पोर्न आणि दहशतवादी कृत्य अशा गोष्टींचा समावेश आहे असा दावा केलाय.
Whatsapp चे मेसेज कूटबद्ध असतात, म्हणुन त्यांना वाचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची मदत घेतली जाते.
असे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर (Facebook and Instagram) देखील शक्य आहे. एखाद्या युजरने कंन्टेंटच्याबाबतीत रिपोर्ट केल्यास असे मेसेज पाहिले जातात.
असं व्हॉट्सअ‍ॅपचे डायरेक्ट ऑफ कम्यूनिकेशन्स कार्ल वूग (Director of Communications Carl Vogue) यांनी मान्य केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Web Title : WhatsApp | facebook can able read your private whatsapp message also watch videos and images new report

 

हे देखील वाचा :

Pune Metro | मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील गणेश मंडळांनी दिला ‘हा’ इशारा

Pune Court | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणातून खून करणाऱ्याला जन्मठेप

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त दराने मिळतंय, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts