IMPIMP

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

by nagesh
Mutual Fund Calculator | mutual fund calculator these mutual funds double their money in one year

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMutual Funds | म्यूच्युअल फंड (Mutual Funds) मध्ये गुंतवणूक करताना ते कमाईसह टॅक्समध्ये सुद्धा बचत करणारे असावेत. अखेर असे कोणते चार टॅक्स सेव्हिंग फंड (tax saving funds) आहेत जे तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतात ते जाणून घेवूयात…

 

1. क्वांट टॅक्स प्लान (Quant tax plan)

क्वांट टॅक्स प्लान डायरेक्ट-ग्रोथ आपल्या श्रेणीतील एक किरकोळ फंड आहे, ज्याचा एयूएम 327 कोटी रुपये आहे.
फंडचे शुल्क प्रमाण 0.5 टक्के आहे, जे बहुतांश इतर ईएलएसएस फंडाच्या खर्चाच्या प्रमाणात कमी आहे.
ही योजना प्रामुख्याने इक्विटी शेयरमध्ये गुंतवणूक करून भांडवल वाढ मिळवण्याच्या हेतू ठेवते.

क्रिसिलने या फंडला हाय रेटिंग दिले आहे. क्वांट टॅक्स प्लान डायरेक्ट-ग्रोथ रिटर्न मागील वर्षासाठी 77.10 टक्के आहे.
आपल्या स्थापनेनंतर, त्याने 21.62 टक्केच्या सरासरी वार्षिक रिटर्न मिळवले आहे.

 

2. कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर (Canara Robeco Equity Tax Saver)

कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर डायरेक्ट-ग्रोथ संपत्तीच्या एयूएम 2,469 कोटी रुपये आहे.
फंडचा एक्सपेंस रेशियो 0.84 टक्के आहे, जो इतर ईएलएसएस फंडपेक्षा कमी आहे.
कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर डायरेक्टचा 1 वर्षाच रिटर्न 55.75 टक्के आहे.

याच्या स्थापनेनंतर त्याचा वार्षिक रिटर्न 17.09 टक्के राहिला.
क्रिसिलने या फंडला हाय रेटिंग दिले आहे. याची नंबर 1 ची सर्वोच्च रँक आहे.
लाँग टर्ममध्ये कॅपिटल बनवण्याच्या उद्देशाने ही योजना प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करते.
ही कलम 80सी अंतर्गत टॅक्स ब्रेकसाठी सुद्धा योग्य आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

3. बीओआय एक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेट फंड (BOI AXA Tax Advantage Fund)

बीओआय एक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज डायरेक्ट-ग्रोथ आपल्या कॅटेगरीतील खुप साधारण फंड आहे.
ज्याचा एयूएम 490 कोटी रुपये आहे. फंडचा एक्सपेंस रेशो 1.67 टक्के आहे.
जो इतर ईएलएसएस फंडांच्या तुलनेत जास्त आहे.

बीओआय एक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज डायरेक्ट-ग्रोथवर नुकताच एक वर्षाचा रिटर्न 60.86 टक्के आहे. याने आपल्या सुरुवातीच्या नंतर सरासरी 19.22 टक्केचा वार्षिक रिटर्न दिला आहे.

 

4. आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज फंड (IDFC Tax Advantage Fund)

आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज डायरेक्ट प्लान-ग्रोथचा एयूएम 3,316 कोटी रुपये आहे. फंडचा एक्सपेंस रेशो 0.87 टक्के आहे,

जो बहुतांश इतर ईएलएसएस फंडद्वारे लावल्या गेलेल्या एक्सपेंस रेशोपेक्षा कमी आहे.
आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज (ईएलएसएस) डायरेक्ट प्लानवर 1 वर्षाचे ग्रोथ रिटर्न 61.78 टक्के आहे. याच्या स्थापनेनंतर याचा सरासरी वार्षिक रिटर्न 18.44 टक्के दिसून आला आहे.

 

Web Title : Mutual Funds | those four mutual funds that help in tax saving along with earning

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 84 नवीन रुग्ण, 227 जणांना डिस्चार्ज

 

Related Posts