IMPIMP

Rain in Maharashtra | उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार; 30 ऑगस्टला ‘या’ जिल्ह्यात Alert

by nagesh
Maharashtra Rains | IMD warns of heavy rain with thunderstorms for the next 4 to 5 days in various parts of maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | मागील साधारण एक आठवडा पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेली दोन दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पावसानं गती घेतली असल्याचं दिसतंय. दरम्यान, महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) उद्यापासून आगामी 4 दिवस पुन्हा पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) देण्यात आली आहे. तसेच, राज्यात आगामी चार ते पाच दिवसात (4 to 5 days) काही भागात जोरदार ते अतिमुसळधार (Rain in Maharashtra) पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम (West) व मध्य भारत (Central India) क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) आगामी 4 दिवस पावसाला जोर येणार आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाची गती वाढत आहे. यावरून राज्यातील परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या जिल्ह्यासह मराठवाड्या, विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | heavy rains will intensify state tomorrow alert mumbai konkan marathwada

 

हे देखील वाचा :

Earn Money | लवकरच सुरू करा ‘हे’ काम, वर्षाला 30 लाखाच्या कमाईची शक्यता; जाणून घ्या सोपी पध्दत

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेकडून 10 लाखाच्या वसुलीचा ‘तो’ तालिबानी आदेश रद्द, जाणून घ्या प्रकरण

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

 

Related Posts