IMPIMP

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेवर मिळत राहील सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या काय आहेत इतर फायदे

by nagesh
SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sukanya Samriddhi Yojana | जर तुमच्या घरात छोटी मुलगी असेल तर तुम्ही सर्वात जास्त व्याज देणार्‍या सेव्हिंग स्कीम (Saving Scheme) चा लाभ घेऊ शकता. सरकारने डिसेंबरपर्यंत या योजनेच्या व्याजदरात (Interest Rate) कोणताही बदल केलेला नाही. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असे या योजनेचे नाव असून यामध्ये 7.6 टक्के व्याज मिळते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वात जास्त रिटर्न (Sukanya Samriddhi Yojana)
या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते. जर तुम्ही दरमहिना 3000 रुपये गुंतवले म्हणजे वार्षिक 36000 रुपये तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होते.

 

 

कसे उघडावे खाते?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) द्वारे तुम्ही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
या योजनेत आई-वडिल किंवा पालक या योजनेत मुलीच्या नावावर केवळ अकाऊंट उघडू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत हे अकाऊंट एखाद्या पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडू शकता.

 

केव्हा मिळेल लाभ?

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे. (Sukanya Samriddhi Yojana)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता?
या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुलीचा जन्माचा दाखला जमा करावा लागेल.
याशिवाय आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

 

Web Title :- Sukanya Samriddhi Yojana | sukanya samriddhi yojana will continue to attract highest interest rate among small saving scheme know other benefits

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR

Pune Crime | कॉलेजच्या फी भरण्यावरुन वादात विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर डोके आपटून केले स्वत:ला जखमी

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

 

Related Posts