IMPIMP

Abdul Sattar | टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याची आदित्य ठाकरेंची टीका झोंबल्याने मंत्री अब्दुल सत्तार त्यांना म्हणाले – ‘छोटा पप्पू…’

by nagesh
Abdul Sattar | so i resign in two days abdul sattars challenge to aditya thackeray for election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Abdul Sattar | तळेगाव, पुणे (Talegaon, Pune) येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील तरुण वर्गामध्ये तसेच विरोधी पक्षांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासाठी विरोधकांनी सत्ताधार्‍यांना जाब विचारला आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shivsena MLA Aditya Thackeray) यांनी म्हटले की, खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही. यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर (State Government) टीकास्त्र सोडताना म्हटले की, टाटा एयरबस प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण, पुन्हा तेच झाले. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?

 

आदित्य ठाकरेंवर टीका करताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, खरेतर मला आश्चर्य वाटत आहे ते
आदित्य ठाकरेंचे. तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईने त्यांनी पाहिले तर
त्यांच्या सगळे लक्षात येईल. 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते?
त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते.

 

अब्दुल सत्तार म्हणाले, या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू
लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abdul Sattar | eknath shinde group abdul sattar mocks aaditya thackeray shivsena as chhota pappu

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | दारु पिता का? या वादग्रस्त व्हिडिओवर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण – म्हणाले…

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

CM Eknath Shinde | “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय”, असा फोन आल्यास सावधान राहण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

 

Related Posts