IMPIMP

Aditya Thackeray | ‘गद्दारांना काय मिळालं ‘बाबाजी का ठुल्लू’, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला (व्हिडिओ)

by nagesh
Budget 2023 | aaditya thackeray reaction on fm nirmala sitharaman union budget 2023

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) आणि युवासेना प्रमुख (Yuva Sena Chief) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज (शनिवार) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सभा घेत आहेत. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Samvad Yatra) माध्यातून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसैनिकांचा उत्साह वाढवत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरु असून आज ते जळगावमध्ये (Jalgaon) आले आहेत. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतून 40 आमदार गेले, सरकार स्थापन झाल, यात गद्दारांना काय मिळाल ? तर दहीहंडीच्या निमित्ताने राज्यातील तात्पुरते मुख्यमंत्री (CM) म्हणाले आम्ही 50 थर लावले आणि राजकीय दहिहंडी फोडली. मी गद्दारांना विचारु इच्छितो दहीहंडी फोडली तुम्ही मलई खाल्ली त्यांनी तुम्हाला मिळालं काय ? त्यांना मिळाला बाबाजी का ठुल्लू, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर हल्लाबोल केला.

 

 

सध्याचा महत्त्वाचा काळ

आदित्य ठाकरे म्हणाले, दोन महिन्यांत राज्यात काय झाले ते तुम्हाला मान्य आहे का ? 50 खोके बरोबर जाणं सोपं आहे, पक्षासोबत राहणं महत्त्वाचे आहे. सध्या महत्वाचा काळ असून राज्यभरात शिव संवाद यात्रेला प्रेम मिळत आहे, पुढचा काळ शिवसेनेचा असेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. विदर्भात अतिवृष्टी झाली आणि आपण हार तुरे स्वीकारणं योग्य नाही, काल दहीहंडी होती तात्पुरते मुख्यमंत्र्यांनी सांगितेल, आम्ही 50 थर लावले, 50 थर होते की आणखी काय ? तसेच ठाकरे परिवार आणि शिवसेनेला एकट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ते शक्य नसल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे बेकायदेशीर सरकार

बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे बेकायदेशीर सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
हे सर्व 40 आमदार एक दोन लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षे पोटी गेले आहेत, मात्र हिंदुत्वासाठी गेले नाही.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला तेव्हा बारमध्ये नाचत असल्यासारखे नाचत होते.
ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही, माणुसकी सोबत आहे.
मी पुन्हा पुन्हा बोलत नाही पण लोकांना कळायला पाहिजे म्हणून त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार म्हणजे बोलणारच असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 

Web Title : – Aditya Thackeray | aditya thackerays shiv samvad yatra in jalgaon district

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | सासरा-जावयाची भांडण सोडवणं मध्यस्थाला पडलं महागात, रॉडने बेदम मारहाण

Bad Cholesterol | भासणार नाही गोळ्यांची आवश्यकता, ‘या’ 5 पद्धतीने कमी करा बॅड कोलेस्ट्रॉल

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी खत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 1.85 कोटींची फसवणूक

 

Related Posts