IMPIMP

Ajit Pawar on Raj Thackeray | अजित पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘अल्टिमेटम द्यायला हे तुमचं घर नाही…’

by nagesh
Ajit Pawar on Raj Thackeray | NCP leader and DCM ajit pawar slams raj thackeray over loudspeaker row

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या गुढी पाडव्यातील भाषणानंतर राज्यात वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत अल्टीमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला होता. औरंगाबादच्या सभेनंतर एकिकडे मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आक्रमक होताना दिसले तर दुसरीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस (Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसले. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोंग्यांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. (Ajit Pawar on Raj Thackeray)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार म्हणाले, ”भोंगे वापरण्यासाठी परवानगी न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. परंतु परवानगी लगेच एक – दोन दिवसांत मिळणार नाही, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ देण्यात येईल. शिवाय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेला निर्णय सर्वांना पाळावाच लागेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एका विशेष समुदायासाठी नाही. त्यामुळे तो आदेश फक्त एका समुदायाने नाही, तर सर्व धर्मांनी पाळणं गरजेचं असल्याचं,” ते म्हणाले. (Ajit Pawar on Raj Thackeray)

 

पुढे अजित पवार म्हणाले, ”राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. पण, त्या अटींचं उल्लंघन झाल्याचं कळतंय. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये. इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल किंवा अजित पवार, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे.”

 

दरम्यान, ”आपल्या राज्यात शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात.
आपण रोज त्यांच्या विचारांचं स्मरण करतो. पण, त्यांच्या विचारांचं स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या.
राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये.
तसेच ज्यांनी भोंगे वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी.
कोणाच्याही दबावाला आणि भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावं.”
असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar on Raj Thackeray | NCP leader and DCM ajit pawar slams raj thackeray over loudspeaker row

 

हे देखील वाचा :

RBI New Guideline on Credit-Debit Card | बँकांची मनमानी रोखण्यासाठी RBI चा मोठा निर्णय ! क्रेडिट-डेबिट कार्डबाबत नवी नियमावली जारी, जाणून घ्या

Sangli Accident News | सांगलीच्या आयर्विन पुलावर भीषण अपघात; टेम्पो-फोरव्हिलरचा चक्काचूर, 2 ठार 8 जण गंभीर जखमी

Police Inspector Transfer Pune | पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; शिवाजीनगर, सहकारनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांची ट्रान्सफर

 

Related Posts