IMPIMP

Atul Bhatkhalkar | भाजपाच्या भातखळकरांनी काढला उद्धव ठाकरेंचा बाप, खालच्या स्तराची टीका, म्हणाले – ‘बापाच्या नावाने थापा आणि…’

by nagesh
Atul Bhatkhalkar | bjp mla atul bhatkhalkar criticized uddhav thackeray dasara melava after his comments on bjp narendra modi and amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Atul Bhatkhalkar | कालच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) शिवसेनेच्या (Shivsena) पारंपारिक दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2022) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपा (BJP), आरएसएस (RSS) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली होती. यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. आता भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा बाप काढत खालच्या स्तराची टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करण्यासाठी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे…

 

 

दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात भाजपावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, अमित शाह (Amit Shah) बोलले होते की आमचे असे काही ठरलेच नव्हते. मी आज शिवरायांच्या साक्षीने माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की भाजपा आणि शिवसेनेचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे ठरले होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की,
नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला
हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तींच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गृहमंत्री अमित शहांवर घणाघात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे
घरगुती मंत्री, हेच कळत नाही. नुसते या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड,
ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवणार. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत.
आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत.

 

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp mla atul bhatkhalkar criticized uddhav thackeray dasara melava after his comments on bjp narendra modi and amit shah

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वडिलांच्या बनावट मृत्यूपत्र प्रकरणात वकील मुलासह इतरांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, पुण्यातील पर्वती येथील प्रकरण

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका; म्हणाले – ‘विचार ही नाही आणि…’

Udayanraje Bhosale | दम असेल तर समोर या…तुम्हाला बघून घेतो, उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

 

Related Posts