IMPIMP

Barsu Refinery Survey | बारसू रिफायनरी सर्वेक्षण ‘पेटलं’, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

by nagesh
Barsu Refinery Survey | ncp ajit pawar on barsu refinery in konkan region locals oppose survey

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोकणातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात (Barsu Refinery Survey) सोमवार पासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. याठिकाणी तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त (Maharashtra Political News) तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलन स्थळावरुन हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. बारसू रिफायनरी सर्वेक्षणावरुन (Barsu Refinery Survey) राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमकी स्पष्ट केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चर्चेतून मार्ग निघू शकतो

अजित पवार म्हणाले, समृद्धी महामार्गालाही (Samriddhi Highway) लोकांनी विरोध केला होता. मात्र चर्चा झाली आणि त्यातून मार्ग निघाला. तशा प्रकारे या प्रकल्पाबाबत वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. जे विरोध करत आहेत (Barsu Refinery Survey) त्यांचे म्हणणं ऐकून घेतल पाहिजे, कारणं समजून घेतली पाहिजे, त्यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. एरॉन प्रकल्प आणतानाही अनेकांनी विरोध केला होता. या प्रकरणी मुस्कटदाबी होऊ नये. संमतीने जे काही व्हायचं ते व्हावं. आम्ही विकासाला विरोध करणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

राष्ट्रवादीची विकासाची भूमिका

विरोध करणाऱ्यांशी चर्चेची भूमिका राज्य सरकारने (State Government) घेतली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) भूमिका विकासाची आहे. मात्र, ते करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, भावी पिढ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्या लोकांची बाजू ऐकून घेऊन त्यात जर तथ्य असेल तर मार्ग काढावा. तथ्य नसेल, तर समजावून सांगितलं पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

 

 

‘त्या’ प्रश्नावर अजित पवार भडकले

यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याबाबत विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले. मला माहिती नाही, तुमचं नॉट रिचेबल वगैरे माझ्यापर्यंत बास झालं. बाकीचे कुठे आहेत ते मला काय विचारता? असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Barsu Refinery Survey | ncp ajit pawar on barsu refinery in konkan region locals oppose survey

 

हे देखील वाचा :

Sharmila Oswal- Millet Evangelist Of India | जागतिक वसुंधरा दिन : जीतो पुणे लेडीज विंग, आरोग्य विभाग – भरड धान्याचे आगार असलेल्या भारतात जगाची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिरूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) – सख्खा भाऊ बनला पक्क वैरी ! 28 वर्षीय वहिनीचा खून तर भावाच्या खुनाचा प्रयत्न

Maharashtra Political News | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट सकारात्मक, वंचितच्या मविआ प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही

 

Related Posts