IMPIMP

WhatsApp युजर्स, सावधान ! ‘हा’ मेसेज तुमच्यासाठी ठरू शकतो अडचणीचा

by bali123
beware whatsapp message free amazon gifts its dangerous do not fall

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे युजर्सच्या फायद्याचे असे अनेक फिचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात असतो. पण WhatsApp वरून आलेला एक मेसेज तुमची डोकेदुखी वाढवू शकतो.

WhatsApp वरून सध्या सर्व्हे मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये Amazon च्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट मिळेल असे सांगितले जात आहे. त्यासाठी एक लिंकही पाठवण्यात आली आहे. जर तुम्हालाही अशाप्रकारचा मेसेज आला असेल तर तुम्ही त्यापासून सावध राहा. कारण हाच मेसेज तुम्हाला अडचणीत टाकू शकतो.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

काय आहे हा नेमका प्रकार?
तुम्हाला WhatsApp वरील मेसेजच्या माध्यमातून एक url दिली जाईल. तुम्ही त्यावर क्लिक केल्यास गिफ्टचे आमिष दाखवून तुम्हाला सर्व्हे पेजवर नेले जाईल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती मागितली जाईल. तसेच तुम्ही कोणता फोन वापरता याचाही पर्याय विचारला जातो. हा सर्व्हे करताना तुम्हाला टायमरही दिसेल त्यामुळे तुम्ही तातडीने हा फॉर्म भरण्याची गडबड कराल आणि यामध्येच आपण फसू शकतो. तसेच तुम्ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर गिफ्ट मिळाल्याचे दिसते. पण ते मिळवण्यासाठी ते शेअर करणे बंधनकारक केले जाते, अशाप्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते.

अशी घ्या काळजी…
कोणत्याही युजर्सला अशाप्रकारे फ्री गिफ्ट मिळत नाही. त्यामुळे युजर्सने अधिकृत url वरूनच माहिती घ्यावी. त्यासाठी तुम्हाला अधिकृत url ओळखता येणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही अशा काही url वर नजर फिरवाल तेव्हा तुम्हाला काही जंक आणि अनवॉन्टेड कॅरेक्टर्स सर्व दिसल्यास तुम्ही त्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts