IMPIMP

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

by bali123
coronavirus anand mahindra urges uddhav thackeray govt focus health infrastructure over lockdown

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि बेड कमी पडू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरीत लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह, गरिब लोक आणि लघु उद्योजक यांच्या मनात याबद्दल चिंता आणि भीतीचं वातावरण असल्याचं चित्र आहे. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी राज्यातील ठाकरे सरकारला या संदर्भात आता एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

‘Lockdown पर्याय होऊ शकत नाही’, भाजपनंतर राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध; CM ठाकरेंची ‘कोंडी’?

आनंद महिंद्रा Anand Mahindra यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ट्विट करत भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये महिंद्रा लिहितात, उद्धवजी समस्या अशी आहे की, लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरिब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये/आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रीत करूया आणि मृत्यू टाळूयात असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी दिला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरीत लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि बेड कमी पडू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसंच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी आणि खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या आहेत.

Also Read

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

 

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

 

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

Related Posts