IMPIMP

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये 11 दिवसांचा कडक Lockdown, पालकमंत्र्याचे नागरिकांना आवाहन (व्हिडीओ)

by bali123
lockdown nanded march 25 april 4 important appeal guardian minister ashok chavan

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर उपाययोजना अवलंबण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने जिल्ह्यात 25 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी ट्विटर अकाऊंटवरुन नागरिकांना आवाहन केले आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत आहेत.

11 दिवसांची संचारबंदी लागू
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणि कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून नांदेडमध्ये 11 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळून कोरोनाला दूर ठेवावे असे आवाहन अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी केले आहे.

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
नांदेड जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. 3 मार्च रोजी 591 रुग्ण आढळून आल्यानंतर 15 मार्चपासून जिल्ह्यात अंशता लॉकडाऊनचे आदेश दिले होते. यामध्ये 18 ते 31 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी 17 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, बेकरी, व्यायाम शाळा, जीम, उद्याने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांचे निर्देश
जिल्ह्यात सर्व अस्थापने बंद करण्यात आली असताना देखील जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च आकडा 947 वर पोहचला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. अखेर रविवारी (दि.21) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढवा घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्याचे निर्देश दिले.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

काय बंद आणि सुरु राहणार ?
नांदेड जिल्ह्यात 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान पूर्णपणे लॉकडाऊन राहणार आहे. संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत मांसविक्रीला घरपोच परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक व खासगी वाहूक पूर्णपणे बंद राहील. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी घेतलेली वाहने, वैद्यकीय कारणास्तव प्रवास करता येणार आहे. शासकीय वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. सर्व प्रकारची बांधकामे बंद राहतील. मात्र, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असेल तर काम करता येईल. लग्न समारंभ, स्वागत समारंभ यावर बंदी असेल. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. तसेच खासगी कार्यालये बंद राहतील. मात्र मार्च एन्डची कामे कार्यालय बंद ठेवून करण्याची परवानगी असेल. सर्व आंदोलने, उपोषण यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts