IMPIMP

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

by bali123
Shivsena MP Sanjay Raut | shiv sena rajya sabha mp sanjay raut chief minister uddhav thackeray delhi ncp bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला. या पत्रानंतर विरोधी पक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली. या दोन मुद्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करा, असे संजय राऊत sanjay raut यांनी म्हटले आहे.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे स्पष्ट केले. तसेच अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांच्या मार्फत करण्यात यावी, असेही शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवार रविवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

तपास यंत्रणा ढगातून पडल्या आहेत का ?
अनिल देशमुख हे मंत्रिपदावर असताना त्यांची निष्पक्ष चौकशी होईल का ? असा प्रश्न खासदार संजय राऊत sanjay raut यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले, जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो ते घेतील. विरोधकांच्या आरोपामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्यातील जनतेला समजले आहे विरोधाचं राजकारण करायचे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसवायच्या. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करायची. या तपास यंत्रणा काय ढगातून पडल्या आहेत का ? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

प्रकाश आंबेडकरांनी घटनेचा अभ्यास करावा
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच ते राज्यपालांना देखील भेटणार आहेत. या संदर्भात राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत. त्यांच्या विषयी यांच्या मनता किती श्रद्धा आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू करण्याची मागणी करत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खोटी-नाटी प्रकरणं तयार करुन राज्य सरकारवर दबाव आणत आहे. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे, कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts