IMPIMP

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेचा 12 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार ?; जाणून घ्या

by nagesh
PM Kisan Yojana | pm kisan yojana 12th installment will be deposite in account on this date

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे. या योजनेचा कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असताना आता 12 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पण, लवकरच या योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या हप्त्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. एका आर्थिक वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवला जातो, तर दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतात. त्याचबरोबर तिसऱ्या हप्त्याचे पैसे डिसेंबर ते मार्च या दरम्यान येतात.

 

ई – केवायसी आवश्यक असणार –

तुम्हाला 12 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुम्ही ई-केवायसी न केल्यास, तुमचे पुढील हप्त्याचे पैसे अडकू शकतात. तुम्ही याप्रमाणे ई-केवायसी करू शकता.

 

सर्वप्रथम अधिकृत शेतकरी पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा
येथे ‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाका.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana 12th installment will be deposite in account on this date

 

हे देखील वाचा :

Sachin Vaze | अनिल देशमुख यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सचिन वाझेंच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या पत्राला ED ने दिली मान्यता

Narayan Rane | नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘गप्प बसून आराम करा’

Pune Crime | पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकार्‍याला मागितली 1 कोटी रुपयांची खंडणी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे गोळा करुन देण्याची मागणी, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts