IMPIMP

Protein Rich Food | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा ‘या’ 2 गोष्टी, मिळेल संपूर्ण प्रोटीन; दुप्पट होईल शरीराची ताकद

by nagesh
Protein Rich Food | according to research 6 amazing health benefits of eating soaked almonds and black gram in empty stomach

सरकारसत्ता ऑनलाइन – Protein Rich Food | बदाम (Almond) हे एक सुपरफूड आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits) आहेत. जे लोक शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत किंवा वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी बदाम सर्वात फायदेशीर आहे. बदामामध्ये फायबर (Fiber) आणि हेल्दी फॅट्स (Healthy Fat) सारख्या अनेक पोषक तत्वांचा (Nutrients) समावेश असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की बदाम स्नायूंपासून केस, त्वचा आणि नखांपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर (Protein Rich Food) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्याचप्रमाणे, काळे हरभरे (Black Gram) मॅग्नेशियम (Magnesium) आणि पोटॅशियम (Potassium) सारख्या मिनरलचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने ब्लड प्रेशर कंट्रोल (Blood Pressure Control) ठेवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी करण्यास मदत होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य (Heart Health) चांगले राहते. काळे हरभरे खाल्ल्याने ब्युटायरेटच्या (Butyrate) उत्पादनाला प्रोत्साहन मिळते जे एक फॅटी अ‍ॅसिड (Fatty Acid) असते. जे सूज कमी करते. काळ्या हरभर्‍यातील अँटीऑक्सिडंट कोलन (Colon Cancer), स्तन (Breast Cancer) आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा (Lung Cancer) धोका कमी करतात.

 

बदाम आणि काळे हरभरे भिजवून, डेझर्टमध्ये किंवा भाजी बनवून खाऊ शकता. या दोन्ही गोष्टी एकत्र भिजवल्याने शक्ती दुप्पट होते. कारण ते रात्रभर पाण्यात भिजवल्याने त्यांची पोषकद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते. ते एकत्र खाल्ल्याने प्रोटीन, आयर्न (Iron) आणि कॅल्शियमसारख्या (Calcium) पोषक तत्वांची कमतरता (Protein Rich Food) दूर होते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रोटीनचा खजिना (Treasure Of Proteins)
भिजवलेले बदाम आणि हरभर्‍यात भरपूर प्रोटीन आढळते. शरीराच्या स्नायूंपासून हाडांच्या मजबुतीपर्यंत प्रत्येकासाठी प्रोटीन आवश्यक असते. एक चमचा भिजवलेल्या बदामात सुमारे दोन ग्रॅम प्रोटीन आढळते. त्याचप्रमाणे भिजवलेल्या काळ्या हरभर्‍यात हेच प्रोटीन आढळते.

 

 

वजन कमी करण्यास उपयोगी (Useful For Weight Loss)
भिजवलेले काळे हरभरे आणि बदामात कॅलरीज कमी आणि पोषकतत्वे जास्त असतात. या दोन्ही गोष्टी प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) आहे. त्यामध्ये असलेले फायबर तुमची भूक भागवते, जे तुम्हाला जास्त खाण्यापासून किंवा अनहेल्दी पदार्थांचे सेवन करण्यापासून प्रतिबंधित करते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हृदय ठेवा निरोगी (Heart Healthy)
बदामामध्ये फ्लेव्होनॉइड्स (Flavonoid) आणि हेल्दी फॅटी अ‍ॅसिड (Healthy Fatty Acid) असतात, त्यामुळे ते हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
हे फ्लेव्होनॉइड्स सूज रोखण्यासाठी ओळखले जातात.
तर व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि इतर विविध पोषक तत्वे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित (Cholesterol Level Control) करतात.

 

 

हाडे होतात मजबूत (Bones Become Stronger)
बदाम आणि काळे हरभरे खाल्ल्याने तुमचे रोजची कॅल्शियमची गरज पूर्ण होते आणि तुमची हाडे मजबूत होतात.
वय वाढल्याने ऑस्टिओपोरोसिसचा (Osteoporosis) धोका असतो. ज्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि ती कमजोर होतात.
कॅल्शियम युक्त बदाम आणि हरभरे तुमची हाडे निरोगी ठेवतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त (Useful In Controlling Blood Sugar)
टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही भिजवलेले बदाम आणि हरभरे खावू शकता.
त्यात कार्ब्ज कमी असतात. हे इन्सुलिनचे (Insulin) कार्य सुधारते.
यामध्ये आढळणारे पोषक घटक मॅग्नेशियम (Magnesium) शुगरच्या रुग्णांसाठी आवश्यक असतात.

 

 

शरीरात होऊ देत नाही रक्ताची कमतरता (Anemia)
काळे हरभरे हिमोग्लोबिनची पातळी (Hemoglobin Level) सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे.
भिजवलेले काळे हरभरे हे शाकाहारी लोकांसाठी लोहाचा उत्तम स्रोत आहेत.
हे हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यास मदत करतात आणि अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे सर्वोत्तम आहे.
गरोदर आणि स्तनदा मातांसाठी बदाम आणि चणे देखील उत्तम आहेत.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Protein Rich Food | according to research 6 amazing health benefits of eating soaked almonds and black gram in empty stomach

 

हे देखील वाचा :

Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

Rainfall Alert | येत्या काही तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी, हवामान खात्याचा इशारा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Shamita Shetty Viral Video | शमिता शेट्टीवर का आली अशी वेळ, सर्वांनी केलं दुर्लक्ष; पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Related Posts