IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संपर्क टाळण्यासाठी पोलीस सावध

by nagesh
Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) पत्राचाळ कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Scam) न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना सुनावणीसाठी पीएमएलए (PMLA – Prevention of Money Laundering Act) न्यायालयात नेले जात असताना पत्रकार त्यांच्यासमोर गराडा घालतात. यावेळी संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) विविध विधाने करुन राज्याच्या राजकारणात धमाल उडवून देतात. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांना माध्यामांसमोर न येऊन देण्याची खबरदारी घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आतापर्यंत संजय राऊत यांना न्यायालयात नेले जात असताना, संजय राऊत  यांनी तुरुंग आणि न्यायालयाच्या आवारात अनेक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांची वक्तव्ये चर्चेचा विषय ठरतात. शुक्रवारी राऊत यांची न्यायालयात सुनावणी आहे. यावेळी त्यांना न्यायालयात नेण्यापूर्वी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर (Arthur Road Jail) मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांचा माध्यमांसोबत संपर्क टाळण्याचा प्रयत्न झाला होता.

 

ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.
आतापर्यंत ज्या पक्षांची नावे आणि चिन्हे गोठविली गेली, त्यांनी पुढे जाऊन पक्ष मोठा केला.
ते पक्ष भविष्यात प्रगती करतात. शिवसेनेचे नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल.
त्यामुळे शिवसेना देखील पुढे मोठी होणार आहे, असे राऊत म्हणाले होते.
तसेच त्यांनी न्यायालयाच्या आवारातून आईला पत्र देखील लिहिले होते. ते पत्र फार गाजले.

 

सक्तवसुली संचलनालयाने (ED – Enforcement Directorate) राऊतांना ऑगस्टमध्ये अटक केली होती.
गोरेगाव येथील पत्राचाळ भूंखंडात गैरव्यवहार झाल्याने त्यात राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा हात असल्याचे आरोप
ईडीने त्यांच्यावर ठेवले आहेत.
त्यामुळे सध्या राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीनासाठी अर्ज देखील केला आहे.
त्यांच्या अर्जावर न्यायालयात तारीख पे तारीख पडत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Shivsena MP Sanjay Raut | mumbai police extra protection to stop shivsena mp sanjay raut from talking to media maharashtra political news

 

हे देखील वाचा :

Pune Congress | चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवणार ‘खुळखुळा’ दिवाळी भेट, काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले – ‘ते राजकारणाला खेळ…’

MCA Election | एमसीए निवडणुकीत पवार-शेलार पॅनलने मारली बाजी, अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना सातत्याने झटके येत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

 

Related Posts