IMPIMP

Aadhaar PAN लिंकसह 10 सरकारी कामांसाठी 31 मार्च अंतिम मुदत; उशीर झाल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या

by pranjalishirish
10 important work including aadhaar pan link deadline 31st march

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी Aadhaar PAN link करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असे तर ३१ मार्चपूर्वी नोंदणीचे काम Aadhaar PAN link पूर्ण करावे लागेल.

पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारची योजना असून लोकांना स्वस्त घर मिळावे हा योजनेचा हेतू आहे. या योजनेचा लाभ ३१ मार्चपर्यंत घेता येईल. या योजनेसाठी घर खरेदी करणाऱ्यांसाठी २.६७ लाख रुपयांची सूट आहे.

कोरोनामुळे चालू आर्थिक वर्ष २०२० ते २०२१ मध्ये सरकारी कर्मचारी एलआयसीचा लाभ घेऊ शकले नाहीत. त्यामुळे सरकारने एलआयसी कॅश व्हाउचर योजना चालू केली. या योजनेंतर्गत लोक १२ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कोणतीही वस्तू अथवा सेवा खरेदी करून एलआयसीवरही दावा करू शकतात.

जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुम्हाला ३१ मार्चपूर्वी ही पॉलिसी खरेदी करावी लागेल. आयकर कलाम ८०C आणि ८०D अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर कर माफीचा लाभ मिळेल.

२०१९-२० साठी उशिरा अथवा सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरण्याचा नियम आहे. बिलेटेड रिटर्न १० हजार रुपयांच्या लेट फीसह १ एप्रिलच्या आत जमा करावा लागेल.

आर्थिक वर्ष २०१९-२० साठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. शेवटच्या तारखेनंतर जर तुम्ही रिटर्न दाखल केले तर तुम्हाला २०० रुपये दंड भरावा लागेल.

आयकर विभागाने प्रत्यक्ष कर विवाद समाधान योजना ‘ विवादातून विश्वास’ अंतर्गत तपशील देण्याची अंतिम तारीख ३१ मार्च निश्चित केली आहे. देय देण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. प्रलंबित योजनेचे निराकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला फायदा पोहचविण्यासाठी इमरजेंसींग क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत ३१ मार्च पर्यंत लोन घेतला जाऊ शकतो. सरकारने यासाठी ३ लाख करोड रुपयांचा निधी ठेवला आहे.

पॅनकार्ड आधारकार्डशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. आपण या महिन्यात आधारवर पॅन न जोडल्यास आपल्याला दंड अथवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात.

स्पेशल फेस्टिव ऍडव्हान्स स्कीम अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये व्याजमुक्त ऍडव्हान्स म्हणून मिळत आहेत. या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

Also Read : 

सीताराम गायकर राष्ट्रवादीत ! ‘हा’ धक्का पिचडांना की लहामटेंना ?

अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाल्या – ‘सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय’

Sachin Vaze Case : ‘सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी पटोले आणि सावंत यांचीच मदत’ ?

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Related Posts