IMPIMP

आता पुन्हा उडाला LPG सिलेंडरच्या दरवाढीचा ‘भडका’; वाचा आजचा दर काय ?

by sikandershaikh
Gas Cylinder | insurance claim lpg gas cylinder price delevery after otp gst rule change from 1 november 2022 see in details

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यानंतर आता दिल्लीतही घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. सध्या या किमती वाढून 794 रुपयांवर गेल्या आहेत. दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या LPG सिलेंडरचे (lpg cylinder) दर 25 रुपयांनी वाढले आहेत. या महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे.

दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा दर 794 रुपयांवर गेला आहे. यापूर्वी हा दर 769 रुपये होता. मात्र, या महिन्यात तब्बल 100 रुपयांची दरवाढ झाली आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारीला हे दर 25 रुपये, 14 फेब्रुवारीला 50 रुपये आणि त्यानंतर आता 25 रुपयांनी वाढले आहेत.
डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत या गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या दरात 35-35 पैसे प्रतिलिटरची वाढ झाली होती.
त्यानंतर आता दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये लिटर झाले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
तर भारतीय बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
मात्र, काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून, अनेक शहरात तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.

पुण्यातील LPG सिलेंडरचे दर काय?

पुण्यात LPG सिलेंडरच्या (lpg cylinder) दरात या नव्या दरवाढीचा परिणाम जाणवणार नसल्याचे सांगितले जात आहे.
सध्या पुणे शहरात 14.2 किलोच्या LPG गॅस सिलेंडरचा दर 772 रुपये झाला आहे.

Related Posts