IMPIMP

फायद्याची गोष्ट ! 769 रुपयांचा LPG Gas सिलिंडर खरेदी खरा फक्त 69 रुपयात; जाणून ‘ही’ जबरदस्त ऑफर

by sikandershaikh
Gas Cylinder | insurance claim lpg gas cylinder price delevery after otp gst rule change from 1 november 2022 see in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अशात जर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर बुक करायचा असेल तर एक छन ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही गॅस सिलिंडर फक्त 69 रुपयांत बुक करू शकता. या सिलिंडरची किंमत 769 रुपये आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. याची सविस्तर माहिती घेऊयात.

एलपीजी गॅस (lpg gas) सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार 700 रुपयांचा कॅशबॅक

गॅस सिलिंडरची ही ऑफर तुम्हाला पेटीएम (Paytm) वर मिळत आहे. यासाठी तुम्हाला पेटीएमवरून सिलिंडर बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा-

– सर्वात आधी Paytm वर जा.

– यानंतर Recharge & Pay Bills हा पर्याय निवडा.

– आता Book a Cylinder हा पर्याय निवडा.

– आता गॅस सर्व्हीस प्रोव्हायडर सिलेक्ट करा.

– इथं 17 अंकी एलपीजी आयडी टाका.

– पुन्हा गॅस सिलिंडर सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्युमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकू शकता.

– आता Proceed हा पर्याय निवडा.

– या ठिकाणी तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसतील. यात 769 रुपये एवढी रक्कम दिसेल,
खाली स्क्रोल कराल तर ऑफर दिसेल. इथं एक स्क्रॅचकार्ड आहे जिथं त्यांना 700 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे.

– यासाठी Proceed to Book Cylinder पर्याय निवडा.

– काही ऑफर्स दिसतील. इथं Apply Promocode असंही दिसेल. यावर क्लिक करा.
आता खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ असणाऱ्या Apply या बटणावर क्लिक करा. यानंर ऑफर अप्लाय होईल.

– आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथंही तुम्हाला पर्याय दिले आहेत.

– पेमेंट करताना तुम्हाला 769 रुपये द्यावे लागतील.

यापैकी काही रक्कम तुम्हाला कॅशबॅकमध्ये मिळून जाईल.
जर हा फायदा तुम्हाला मिळाला तर तुम्हाला सिलिंडर फक्त 69 रुपयांत मिळेल.

टीप – 700 रुपयाचा कॅशबॅक युजरला एकदाच मिळणार आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमनं अनेक गॅस कंपन्यांसोबत करार केला आहे.

Related Posts