IMPIMP

डॉ. बाबासाहेबांनी दिलेले सर्वश्रेष्ठ संविधान आज धोक्यात आले – मल्लिकार्जुन खरगे

by Team Deccan Express
ambedkars words about dictatorship are coming true mallikarjun kharge

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करुन देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. मात्र, आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्यकारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक राहिलेली नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व संस्थांचा दुरुपयोग वाढलेला आहे. सरकारच्या विरोधात बोलले की चौकशी लावली जाते. आंदोलन केले तर बदनाम केले जात आहे. भाजप- आरएसएस हे समाजात विद्वेषाचे बीज पेरुन धर्माच्या, जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम करत आहेत. आता लोकशाही व संविधान रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द खरे ठरत आहेत, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे mallikarjun kharge यांनी म्हटले आहे.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र प्रदेश कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी खरगे mallikarjun kharge बोलत होते. ही व्हर्च्युअल अभिवादन सभा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्याचे प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे होते. तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संविधानाचे रक्षण करु
महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे विचार एकच असून समाजातील दलित, आदिवासी, शोषीत समाज व महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याचा हा विचार आहे. आंबेडकरांचा पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही भिन्न पक्ष होते पण त्यांची विचारधारा मात्र समान होती. समाजातील शोषीत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. परंतु रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानाचे रक्षण करु, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

देशाला तोडणारा विचार नष्ट करु
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण हे देशातील शोषित, वंचित, पददलित समाजाला न्याय देणारे होते. परंतु दुर्दैवाने आज केंद्रातील सरकार हे देशभरातील मुठभर लोकांसाठीच आर्थिक धोरण राबवत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणारा असून हा विचार राज्यात यापुढेही रुजवू आणि देशाला तोडू पाहणारा विचार नष्ट करण्याचे काम करु. डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान संपुष्टात आणू पाहणाऱ्या भाजपा-राष्ट्रीय स्वसंसेवक संघाला ते काम करु देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Also Read :

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts