IMPIMP

Anil Deshmukh | ED चा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘मुंबईतल्या 10 बार मालकांनी अनिल देशमुखांना 3 महिन्यात दिले 4 कोटी रुपये दिले’

by bali123
Anil Deshmukh | 10 bar owners mumbai paid rs 4 crore anil deshmukh three months ed

सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर शुक्रवारी (दि. 25) सकाळी ईडीने (ED) छापे टाकले आहेत. दरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी (Bar owner) सलग 3 महिने देशमुखांना 4 कोटी रुपये दिल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्याच आधारे देशमुखांच्या घरांवर ईडीने (ED) छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. Anil Deshmukh | 10 bar owners mumbai paid rs 4 crore anil deshmukh three months ed

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Waze) दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांनी केला होता. या प्रकरणी देशमुखांची सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. यात पैश्यांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. ईडीकडून आज सकाळपासून चार विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानाचा समावेश आहे देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि खासगी सचिव संजीव पालांडे (Secretary Sanjeev Palande) यांच्या घरावरही छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील 10 बार मालकांचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. यात ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलीस दलातून (Mumbai Police Force) निलंबीत केलेल्या सचिन वाझेंने मुंबईतील बार मालकांकडून दरमहा 40 ते 50 लाख वसूल केल्याचा आरोप आहे.

Web Title :- Anil Deshmukh | 10 bar owners mumbai paid rs 4 crore anil deshmukh three months ed

Related Posts