IMPIMP

चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

by bali123
ashok-navale committed-suicide-he lodged a complaint against chitra wagh suporter in pandharpur

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – अशोक नवले यांनी भाजपचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यातच आता तक्रारदार अशोक नवले यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विदूल पांडूरंग अधटराव हे भाजपाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ chitra wagh यांचे निकटवर्तीय आहेत. पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी ५ मार्च रोजी भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर धाड टाकली होती. अधटराव यांच्याविरुद्ध अशोक नवले यांनी तक्रार केली होती पण आता अशोक नवले यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

अशोक नवले यांच्या पत्नीने केले आरोप
“माझ्या पतीने विदूल अधवटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दादा फुंडकर हे घरी आले होते. त्यानंतर त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. यामुळे माझे पती २ दिवस दबावाखाली होते. यामुळे पहाटे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. विदूल अधवटराव आणि कुमार तारापूरकर यांनी माझ्या पतीला गेल्या वर्षभरापासून त्रास देण्यात येत होता. असा आरोप अशोक नवले यांच्या पत्नीकडून करण्यात आला आहे. तसेच विदूल अधटराव आणि कुमार तारापुरकर यांनी अशोक नवले यांना मारहाण केल्याचा आरोप नवले कुटुंबाकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी अशोक नवले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

…म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं म्हणत रोहित पवारांनी साधला जावडेकरांवर ‘निशाणा’

काय आहे नेमकं प्रकरण
खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे अनेक व्यवहार केले होते. त्यांच्याविरोधात अशोक नवले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अशोक नवले यांच्या तक्रारीवरून पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर धाड टाकली. तेव्हा या धाडीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशेब वह्या, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅंक पासबुकसह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले होते.

RSS मध्ये मोठा बदल ! भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रेय होसबोले, जाणून घ्या नवीन सरकार्यवाह यांच्याबाबत

अधवटराव यांच्यापाठोपाठ त्यांच्या इतर साथीदारांचा सुद्धा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अधवटराव यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात १३५/२०२१ महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ सह भा.दं.वि.कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला आहे.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विदूल अधटराव हे भाजप नेत्या चित्रा वाघ chitra wagh यांचे निकटवर्तीय आहेत. अधटराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशोक नवले यांच्या आत्महत्येमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !

Related Posts