IMPIMP

Atul Bhatkhalkar । ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, भाजपचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल

by bali123
Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar slams shivsena chief uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Atul Bhatkhalkar । मागील काही दिवसापूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) उत्तर प्रदेश राज्यातील प्रचंड प्रमाणात सुरु असलेल्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांनतर आता युपी राज्यातून आता थेट महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात हे रॅकेट पोहचले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस (ATS) पथकाने बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना सोमवारी (28 जून) रोजी अटक केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. Atul Bhatkhalkar questions to Uddhav Thackeray) atul bhatkhalkar criticized chief minister uddhav thackeray over religion conversion racket issue

उत्तर प्रदेश राज्यात धर्मांतरण रॅकेटसाठी सात पद्धतीचे कोड वापरण्यात येत होते.
हे सर्व कोड डिकोड करून त्याचा अर्थ उलगडला आहे. उत्तर प्रदेश राज्यासह देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) केला होता.
तसेच, या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले असल्याने यावरूनच भाजपचे
आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केलीय.

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.
ट्विट करत भातखळकर यांनी ठाकरे यांना सवालही केला आहे.
‘उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे.
त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार.
ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत.
जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, असे अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, उत्तर प्रदेश (UP) पोलिसांच्या एटीएसने (ATS) मूळ दिल्लीतील रहिवाशी असणाऱ्या मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती.
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती.
मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून, एक हजारांपेक्षा अधिक लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले होते.
तर, उमर गौतम आणि जहाँगीर यांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी
नवी दिल्लीतील स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी पुढे येऊन त्यांना सोडण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतंय
त्यात मिडियाचा एक मोठा गटही काम करतोय असा आरोप या संघटनेने केला.

Web Title : atul bhatkhalkar criticized chief minister uddhav thackeray over religion conversion racket issue

Related Posts