IMPIMP

Beed Shiv Sena | शिवसेना बीड जिल्हाप्रमुखांवर शहरप्रमुखाने फेकले तेल, समर्थकांनी दिला बेदम चोप

by bali123
beed shiv sena district chief aappasaheb jadhav ruckus after dhananjay papa solanke throws oil, supporters beaten

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना बीड जिल्हाप्रमुख (Beed Shiv Sena) पदाच्या निवडीवरुन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरुन बीडमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Aappasaheb Jadhav) यांच्या अंगावर तेल फेकल्याबद्दल जाधव समर्थकांनी माजलगाव (Majalgaon) शहरप्रमुख धनंजय सोळंके (Dhananjay Solanke) यांना बेदम मारहाण केली. ही घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. beed shiv sena district chief aappasaheb jadhav ruckus after dhananjay papa solanke throws oil, supporters beaten

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर निवड झाली आहे. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख बदल कोणाच्या भल्यासाठी असा सवाल उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला होता. दरम्यान नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख जाधव निवडीनंतर पहिल्यांदाच बीडला आले होते. त्यावेळी जाधव यांच्या अंगावर माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी तेल फेकल्याचा आरोप आहे. तेल फेकल्याने जाधवांच्या संतापलेल्या समर्थकांनी सोळंके यांना मारहाण केली. माजलगावमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Web Title :- beed shiv sena district chief aappasaheb jadhav ruckus after dhananjay papa solanke throws oil, supporters beaten

Related Posts