IMPIMP

Girish Bapat : ‘पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य समोर येणार अन् ‘दूध का दूध’, ‘पानी का पानी’ होणार’

by bali123
bjp leader girish bapat target sharad pawar and anil deshmukh delhi

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. त्यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचे म्हटले होते. त्यावरून आता पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट Girish Bapat यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश बापट Girish Bapat बोलत होते. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुजेटच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येणार आहे. आता लवकरच ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार वाढला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. कोण कुठे होते यापेक्षा परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे महत्वाचे आहे’.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

दरम्यान, शिवसेना खासदारांच्या विधानाकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यावर बापट Girish Bapat म्हणाले, ‘शिवसेना खासदारांचे सभागृहात बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच पडतील’.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts