IMPIMP

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

by bali123
maharashtra political crisis police transfer posting money devendra fadnavis uddhav government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या निलंबित असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. याबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने लिहिले होते. त्यानंतर आता याच मुद्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी खळबळजनक विधान केले आहे.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारवर विविध मुद्यांवरून सातत्याने टीका करत आहेत. त्यातच आता त्यांनी राज्यात बढत्या-बदल्यांचे रॅकेट सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून भ्रष्टाचार चालतो. याचा खुलासा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कारवाई केली आहे. माझ्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात गुप्तचर विभागाच्या माध्यमातून एक रॅकेटचा भांडाफोड केला होता. आम्ही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या परवानगीने काही कॉल इंटरसेप्ट केले आहेत. ज्यामध्ये काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे’.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

दरम्यान, महाराष्ट्रात उच्च स्तरावर बढत्या आणि बदल्यांचे रॅकेट सुरु आहे. या सर्वांचे माझ्याकडे पुरावे आहेत, असे फडणवीस म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट गृहमंत्र्यांना पाठवला होता. रिपोर्टवरून कारवाई करण्याऐवजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनाच कारवाईला सामोरे जावे लागले होते. इंटरसेप्शनमध्ये आरोपी लोकांना पदोन्नती देण्यात आली. या रिपोर्टवरून कोणतीही कारवाई केली गेली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts