IMPIMP

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

by bali123
bjp leader nilesh rane slams bhai jagtap

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेसचे नेते भाई जगताप हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्या टीकेला अमृता फडणवीस यांनी दिलेले उत्तर यामुळे ते अधिक चर्चेत आले आहेत. मात्र आता भाई जगताप यांच्याविरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी Nilesh Rane ट्विटरवरून भाई जगताप हे टपोरी असल्याची टीका केली आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

काय म्हणाले निलेश राणे
“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक’ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,” अशी टीका निलेश राणे Nilesh Rane यांनी ट्विटरवरून केली आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

भाई जगताप विरुद्ध अमृता फडणवीस
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खूपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी फडणवीस यांना उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भातील मुद्द्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. भाई जगताप यांनी ‘मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं’, अशी टीका केली होती. या टीकेला अमृता फडणवीस यांनी “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!”, अशा शबदांत उत्तर दिले होते.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts