IMPIMP

‘अखेर महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण ? राज्यात महाविकास आघाडी नव्हे, तर महावसुली सरकार?’

by bali123
bjp minister ravishankar prasad questions maharashtra government over anil deshmukh corruption

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 100 कोटींच्या वसुलीच्या टार्गेटबाबतचा दावाही त्यांनी केला आहे. या लेटरबॉम्बमुळं राज्यासह दिल्लीतही वातावरण तापलं आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद (RaviShankar Prasad) यांनी टीका केली आहे. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून त्यांनी ठाकरे सरकारला घेरलं आहे. अखेर महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण ? राज्यात महाविकास आघाडी नव्हे, तर महावसुली सरकार चालवलं जात आहे अशी बोचरी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

‘पवारांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करायची असेल तर त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा’
रवीशंकर प्रसाद RaviShankar Prasad म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट निश्चित केलं आहे, असं एखाद्या माजी आयुक्तानं लिहिणं हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. जर एका मंत्र्याचं टार्गेट 100 कोटी आहे तर इतर मंत्र्यांचं किती असेल. शरद पवारांनी अनिल देशमुख यांचा बचाव केला आहे जे चुकीचं सिद्ध झालं. जर पवारांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करायची असेल तर त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा असा सल्लाही रवीशंकर प्रसाद यांनी दिला आहे.”

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

‘बदली आणि पोस्टींगच्या नावावर वसुली सुरू होती…’
पुढं बोलताना रवीशंकर प्रसाद म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दस्तऐवजांच्या आधारे, बदली आणि पोस्टींगच्या नावावर वसुली सुरू होती असं सांगितलं होतं. तीही छोट्या मोठ्या अधिकाऱ्याचीच नव्हे तर मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

‘ही कथित वसुली सरकारसाठी होती की, आघाडीतील पक्षांसाठी ?’
रवीशंकर प्रसाद असंही म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यावर काही कारवाई करतील अशी आशा होती. परंतु असं होताना दिसत नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांची बदली केली. ही कथित वसुली सरकारसाठी होती की, आघाडीतील पक्षांसाठी (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) होती ? असा सवालही त्यांनी केला आहे.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts