IMPIMP

कोरोना परिस्थितीवरून पंकजा मुंडेंचे थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या…

by Team Deccan Express
Pankaja Munde | beed bjp jan ashirwad yatra bhagwat karad pankaja munde slam party worker

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती बिकट बनत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण आला आहे. त्यातच बीड जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व परिस्थितीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे pankaja munde यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर काही ठिकाणी गरजेनुसार लसींचा पुरवठा न केल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यातच बीडमध्येही परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे pankaja munde यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याबाबतची माहिती पंकजा मुंडे pankaja munde यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘रेमडेसिव्हिरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्यमंत्री यांना विनंती आहे, की जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाखपैकी बीडला ही पुरेशा लसींच्या मात्रा मिळाला पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत’.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

काय म्हटले आहे पत्रात?
बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत जिल्ह्यात 729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 इतकी आहे. त्यातील 30 हजार 478 जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

 

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts