IMPIMP

‘खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…’

by bali123
File a case against MP Imtiaz Jalil, otherwise ...

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज पासून सुरु होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल Imtiaz Jalil यांनी मिरवणूक काढली. तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केले.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

यानंतर भाजपने आक्रमक होत खासदार इम्तियाज जलिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लॉकडाऊन रद्द झाल्याच्या घोषणेनंतर संचार बंदी असताना खा. जलिल Imtiaz Jalil यांनी मिरवणूक काढून नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने सिटी चौक पोलिसांना निवेदन देऊन केली. तसेच आज (बुधवार) रात्री सात वाजण्याच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

संजय केणेकर यांनी सांगितले की, लॉकडाऊन विषयी भाजपने आपली भूमिका मांडली आहे. आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घातला व वस्तुस्थिती सांगितली. यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन रद्द केला. मात्र, याचे श्रेय खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jalil यांनी घेतले. एवढेच नाही तर संचारबंदीचे उल्लंघन करुन मिरवणूकही काढली. यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे. खासदारांसह कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत मास्क घातले नव्हते, असे केणेकर यांनी म्हटले.

ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजप आमदारानं शेअर केली निमंत्रण पत्रिका !

संजय केणेकर यांनी पुढे सांगितले की, जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तसेच सायंकाळी सात वाजेपर्यंत खासदार इम्तियाज जलील व कर्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही केणेकर यांनी दिला आहे.

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

 

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

 

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

 

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

 

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

 

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

 

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

 

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts