IMPIMP

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

by bali123
Navneet Rana | navneet ranas target uddhav thackeray over women cm statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – navneet rana | निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला आहे. याप्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एका खासदाराने निशाणा साधला आहे. या खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा navneet rana यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘ज्याप्रकारे इतर आरोप लागले आहेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसूल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला 100 कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल? जर अशापध्दतीने खंडणी वसूल करण्याचे काम सुरु झाले तर संपूर्ण देशात असे होऊ शकते’.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

तसेच सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर बोलताना राणा navneet rana म्हणाल्या, ‘जो व्यक्ती 16 वर्षे निलंबित होता, 7 दिवस तुरुंगात राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले गेले? जेव्हा भाजपचे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वांत आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts