IMPIMP

शिवसेनेला धक्का ! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्षपदी संजना सावंत

by bali123
narayan ranes victory over shiv sena and mahavikas aghadi bjps sanjana sawant wins sindhudurg zip

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाईन – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजप नेते खासदार नारायण राणे narayan rane यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपकडून राणे समर्थक असलेल्या कणकवलीच्या संजना सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

भाजपकडून संजना सावंत तर शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर या दोघींमध्ये लढत होती. राणे पिता-पुत्रांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिले होते. भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असे त्यांनी ठरवलेच होते. इतकेच नाहीतर राज्यसभा खासदार असलेल्या नारायण राणे narayan rane यांनी लोकसभेचे अधिवेशन सोडून सिंधुदुर्गात ठाण मांडून बसले होते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला जात होता. अखेर या निवडणुकीत भाजपच्या संजना सावंत यांचा विजय झाला.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

भाजपच्या विजयाचे ट्विट भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘गल्लीत बसून भुंकणारे शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्या नाकावर ठेचून राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला. जिल्हा परिषद अध्यक्षपदी सौ. संजना सावंत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

आरोप-प्रत्यारोपांची फैरी
या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते सतिश सावंत यांच्यावर सदस्य फोडीवरुन गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे सदस्य फूटू नयेत म्हणून गेले चार दिवस आपल्या पडवे येथील रुग्णालयात जिथं रुग्ण ठेवले जातात, त्या ठिकाणी सदस्यांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ राणेंवर आली आहे, असे सावंत म्हणाले होते.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts