IMPIMP

Navneet Kaur Rana | ‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही, शरद पवार, अजित पवारांना ओळखते’; ‘त्या’ टीकेला नवनीत राणाचे प्रत्युत्तर

navneet karu rana | mp navneet rana responds to ncp leader rupali chakankars criticism

अमरावती न्यूज (Amravati News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांच्यावर टीका केली होती. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड चोरतो हे तर ‘बंटी-बबली’ निघाले अशी टीका चाकणकर यांनी केली होती. रुपाली चाकणकर यांच्या टीकेला नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना ओळखते. ओळखीच्या माणसांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे. navneet karu rana | mp navneet rana responds to ncp leader rupali chakankars criticism

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पावसाळी अधिवेशनामध्ये रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावर रुपाली चाकणकर यांनी बायको जात चोरते तर नवरा राजदंड चोरतो अशी जहरी टीका केली होती. दरम्यान, मागच्या महिन्यात खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाण पत्र हायकोर्टानं रद्द केलं होतं.
यावरुन रुपाली चाकणकर यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला होता.

मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही

रुपाली चाकणकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही.
मी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना ओळखते.
त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते.
त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन.
ज्यांना मी ओळखत नाही, त्यांच्यावर मी काहीही बोलू शकत नाही.
अशी टीका नवनीत राणा यांनी चाकणकर यांच्यावर केली.

मी अपक्ष खासदार

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवनीत राणा यांना संधी मिळणार असल्याची चर्चा होती.
परंतु जातवैधता प्रमाणपत्राच्या वादात नवनीत राणा अडकल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, मला फक्त दोनच वर्षे झाली आहेत.
मला अजून खूप काम करायचं आहे. तसंच आपण अपक्ष खासदार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title : navneet karu rana | mp navneet rana responds to ncp leader rupali chakankars criticism