IMPIMP

Nawab Malik | भाजप नेत्यांकडूनच गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

by bali123
Nitin Gadkari | nitin gadkari reveals big secret i bulldozered my father in law s house without informing wife

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Nawab Malik |आजपासून दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) सुरुवात होत आहे. परंतु त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी करुन भाजप नेते नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (NCP leader and minister Nawab Malik) यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नवाब मलिक (Nawab Malik) विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुधारित कृषी विधेयक (Revised Agriculture Bill) आणले जाईल, अशी माहिती दिली. नवाब मलिक म्हणाले, कुणी काय तक्रार करत आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आरोप करत असताना यापूर्वी पण किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोप केले आहेत. आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दाखील नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे, असे दिसून येत आहे, असेही मलिक म्हणाले.

गडकरींना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार होते

नवाब मलिक पुढे म्हणाले, नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद (BJP national president) देण्यात येणार होते. परंतु त्यावेळी देखील नितीन गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले, आता पुन्हा नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावरुन भाजपमध्ये अंतर्गत वाद दिसून येत आहेत, असंही मलिक म्हणाले.

मलिक यांचा फडणवीसांना टोला

मन मिळाली नाही तरी चालेल पण हातातून हात मिळाले पाहिजे. राजकारणात कटूता आणि शत्रुता कायम नसते. जर मनभेद असतील तर बोलून त्यावर मार्ग काढला पाहिजे. जर मनातलं बोलून नाते सुधारत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.

केंद्राने कायदे रद्द करावेत

देशात तीन कृषी कायदे केले आहेत. आजही या विरोधात शेतकरी आंदोलन (farmers protest)
करत आहेत. सुप्रीम कोर्टाने ((Supreme Court) या कायद्यांना स्थगिती दिली आहे नुसार किती
स्टॉक ठेवायचा याला मर्यादा राहणार नाही. पण मागील शुक्रवारी स्टॉक लिमिटबाबत अध्यदेश
काढण्यात आला आहे. त्यामुळे हे कायदे केंद्राने रद्द करावेत, अशी मागणी मलिक यांनी केली.

Web Titel : Nawab Malik | bjp leaders try to get gadkari in trouble alleges nawab malik

Related Posts